Type to search

धुळे राजकीय

दोंडाईचात काँग्रेस पक्षाला हादरा

Share

दोंडाईचा । शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये येणार्‍याची गर्दी होत असून साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, शिंदखेडा शहराचे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख यांच्यानंतर आता दोंडाईचा शहरातील काँग्रेस शहराध्यक्ष मनोज तेली, माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, नथु धनगर, माजी नगरसेवक रमेश बोरसे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोज मालू, काँग्रेसचे सरचिटणीस शहाबाज शाह, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू धनगर, मुश्ताक शेख, लाला बागवान, नानाभाऊ पाटील, दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ना. जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला यामुळे दोंडाईचा शहरात काँग्रेस पक्षाला यांच्या निमित्ताने मोठा हादरा बसला आहे

शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल यांनी अतिशय नियोजनबद्ध विकास करून बुराई नदी बारमाही करणे, तापी नदीच्या काठावरील 22 उपसा योजनांना निधी आणणे, दोंडाईचा आणि शिंदखेड्यात आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, याशिवाय प्रत्येक गावात वेगवेगळ्या योजनांचा आणलेला निधी, शिंदखेड्यात जवळपास 5 हजार लोकांना सिंचन विहिरी, त्यातून शेतकरी मोठा समाधानी असून जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे प्रत्येक गावाच्या शिवारात अडलेले पाणी त्यातून भविष्यात होणारा विकास पाहता काँग्रेसमधून भाजपात येणार्‍यांनी आपल्या मनोगता तुन व्यक्त केले

ना.जयकुमार रावल यांनी सर्व प्रवेश करणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश दिला यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप कागणे, शहराध्यक्ष प्रविण महाजन, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पोपटराव सोनवणे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, नगरसेवक विजय मराठे, संजय मराठे, नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, राजेश जाधव, निखिल जाधव, कृष्णा नगराळे, ईश्वर धनगर, जितेंद्र गिरासे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!