देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत शिर्डी 56, नगर 183 स्थानावर

0

नवी मुंबई टॉप टेनमध्ये

नवी दिल्ली – देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे. पुणे 13 स्थानावर आहे.

 

साईबाबाची शिर्डी 56 तर अहमदनगर 183 व्या स्थानावर आहे.
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी गुरुवारी जाहीर केली. यामध्ये पहिल्या स्थानवर मध्यप्रदेशातील इंदूर शहर असून अनुक्रमे भोपाळ, विझाग, सुरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि बडोदा या शहरांचा टॉप टेनच्या यादीत समावेश आहे. यंदाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे ही गुजरातमधील आहेत.

 
दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे सर्वात शेवटी आहे. तसेच, सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये सुद्धा 20 शहरे ही एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या 10 शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता. यामध्ये अनुक्रमे म्हैसूर, चंदीगड, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, विशाखापट्टणम, सूरत, राजकोट, गंगटोक, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईचा टॉप टेनमध्ये समावेश होता.
महाराष्ट्रातील शहरे आणि त्यांचे

 
स्वच्छ भारतमधील स्थान
नवी मुंबई : 8, पुणे : 13,बृहन्मुंबई : 29,शिर्डी : 56,पिंपरी चिंचवड : 72,चंद्रपूर : 76, अंबरनाथ : 89, सोलापूर : 115, ठाणे : 116, धुळे : 124, मिरा भायंदर : 130, नागपूर : 137, वसई – विरार : 139, इचलकरंजी : 141, नाशिक : 151, सातारा : 157, कुलगाव बदलापूर : 158,जळगाव : 162,पनवेल : 170, कोल्हापूर : 177, नंदूरबार : 181,अहमदनगर : 183, नांदेड वाघाळा : 192, उल्हासनगर : 207, उस्मानाबाद : 219, परभणी : 229, यवतमाळ : 230, अमरावती : 231, कल्याण डोंबिवली : 234, सांगली, मिरज कुपवाड : 237, मालेगाव : 239, उदगीर : 240, बार्शी : 287, अकोला : 296, औरंगाबाद : 299, बीड : 302, अचलापूर : 311, वर्धा : 313, लातूर : 318, गोंदिया : 343 , हिंगणघाट : 355, जालना : 368, भिवंडी निजामपूर : 392, भुसावळा : 433.

 

2000 गुणांसाठी झाले सर्वेक्षण
स्वच्छ भारत मोहिमेत सर्वात स्वच्छ शहर निवडण्यासाठी 2000 गुण ठेवण्यात आले होते. यापैकी 900 गुण स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामकाजाला, 500 गुण केंद्राच्या स्वच्छता पथकाने केलेल्या निरीक्षणास आणि स्वच्छतेवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना 600 गुण ठेवण्यात आले होते.

शिर्डीला 1397 गुण, राज्यात चौथा क्रमांक
देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत साईबाबांची शिर्डी झळकली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, नगर जिल्ह्यात शिर्डीला सर्वाधिक 1397 गुण मिळाले असून देशाच्या यादीत 56 व्या तर राज्यात चौथ्या स्थानावर आहे. अहमदनगर शहराला 1034 गुण असून 183 क्रमांकावर आहे. विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणे 13 व्या स्थानावर असून 1660 गुण आहेत. तर नाशिकने 151 वा क्रमांक पटकावला असून 1106 गुण मिळविले आहेत.

LEAVE A REPLY

*