देशदूत वृत्ताची दखल ; फुटलेले ड्रेनेज चेंबर काही तासांतच दुरुस्त

0

इंदिरानगर (प्रतिनिधी) : येथील नळे मळा भागात फुटलेल्या ड्रेनेजचे पाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात साचत असल्याचे व त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे सविस्तर सचित्र वृत्त दै.देशदूत मध्ये प्रसिद्ध होताच सुस्तावलेल्या मनपा प्रशासनाला खडबडून जाग आली व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने फुटलेल्या ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून रस्त्यावर वाहणारे पाणी बंद केल्याने परीसरवासीयांनी समाधान व्यक्त करीत देशदूतचे आभार मानले.deshdoot-impact

इंदिरानगरातील नळे मळा येथे अनेक महिन्यात पासून रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले होते., अंधाऱ्यावेळी तर हा खड्डा भरलेल्या पाण्यामुळे लक्षात न येऊन अनेक वाहनांना लहान मोठया अपघातांना सामोरे जावे लागत होते.

त्यातच मागील एक आठवड्यापासून ड्रेनेजचा चेंबर फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत होते. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात सर्वत्र रस्त्यांची डागडुजी केली जात असताना या रस्त्यावरील खड्डा बुजवायचा महापालिकेला विसर पडल्याने गेल्या वर्षभरापासून असलेला हा खड्डा महापालिकाप्रशासनाच्या(अव) कृपेने अजूनही आहे त्याच स्थितीत असल्याबद्दल परीसरवासीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*