‘देशदूत’तर्फे आयोजित ‘सचिन’ चित्रपट महोत्सवाचा शिंदखेड्यात आज शुभारंभ

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी- दै.देशदूततर्फे जिल्ह्यात सचिन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.15 जून रोजी या महोत्सवाचा शिंदखेडा येथे शुभारंभ होत आहे.
सकाळी 9 वाजता शिंदखेडा येथील अशोक चित्र मंदिरात महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या जीवनकार्यावर आधारीत ‘सचिन ए ब्रिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
या चित्रपट महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी शिंदखेड्याचे माजी सरपंच अनिल वानखेडे, नगराध्यक्षा सौ.मथुराबाई नामदेव मराठे, उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, वर्शी ता.शिंदखेडा येथील सप्तर्षी इंग्लिश मेडियम स्कूलचे चेअरमन डी.आर.पाटील, व्ही.के. इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन माधुरी पाटील, व्ही.के. पाटील, तहसीलदार रोहिदास वारुडे, गटविकास अधिकारी एस.एस.शिवदे, पोलीस निरिक्षक देवीदास भोज तसेच दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक बांधिलकी ठेवून ‘देशदूत’तर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी ‘देशदूत’ दि. 15 ते 18 जून दरम्यान जिल्हाभरात राबवित आहे.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरवर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवाला दि. 15 जून रोजी शिंदखेडा येथून सुरुवात होत असून समारोप दि.18 जून रोजी धुळ्यातील प्रभाकर चित्रमंदिर येथे होणार आहे.

हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असून सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला राहिल. शिंदखेडा येथे दि.15 जून रोजी सकाळी 9 वाजता शिंदखेडा येथील अशोक चित्रमंदिरात दाखविण्यात येणार्‍या या चित्रपटाचा बालगोपालांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देशदूत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

यासाठी सप्तर्षी बहुउद्देशिय संस्था संचलित प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूल, अनिल वानखेडे, माजी सरपंच शिंदखेडा आणि व्ही.के.पाटील इंटरनॅशनल स्कूल, शिंदखेडा यांच्या सहकार्य लाभले आहे.

 

LEAVE A REPLY

*