बोगस डॉक्टर प्रकरण : चांदवड उपजिल्हारुग्णालयात पथकाकडून झाडाझडती ; अहवाल सादर

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) : चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवार (दि १) रोजी घडलेल्या बोगस डॉक्टर मार्फत रुग्ण तपासणी करण्यात येत असल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर नाशिकहून आलेल्या तपास पथकांने सखोल चौकशी करीत आरोग्य संचालकाना आज अहवाल सादर केला.

बोगस डॉक्टरामार्फत करण्यात आलेल्या तपासणी प्रकरणी आज जिल्हा रुग्णालय नाशिक येथील निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही डी पाटिल  व वरिष्ठ लिपिक प्रशांत जोशी यांच्या पथकाने आज चांदवड उपजिल्हा रुग्णालयाची झाडा-झडती घेतली.

त्यात रुग्णालयाचे बाह्य रुग्ण विभाग, अंतरुग्ण विभागातील रुग्णाची विचारपूस करत त्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच बरोबर रुग्ण कल्याण समितीचे प्रशांत ठाकरे व तुकाराम सोनवणे यांचे म्हणने जाणून घेत त्याच्याकडून लेखी जवाब लिहून घेतला आहे.

यावेळी त्या बोगस डॉक्टरने दिलेल्या औषधाच्या पावdeshdoot-impactत्या देखील सादर करण्यात आल्या. रुग्ण तपासणी करतानाचे फोटो व शुटींग देखील त्यांना देण्यात आले.

त्यानंतर प्रकार घडला त्यावेळी कामावर असलेल्या डॉ अभिजित नाईक व वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे यांना त्याची बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचा गोपनीय अहवाल आरोग्य संचालक सतीश पवार यांच्याकडे इमेल द्वारे पाठवून दिला आहे.

या घटनेसंदर्भात आमदार डॉ राहुल आहेर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्री जगदाळे यांची भेट घेत सदर घटनेची दखल घेत संबधित वैद्यकीय अधिकारी अभिजित नाईक व  वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

*