‘देवसेना’ आता बॉलिवूडमध्ये?

0

जेव्हापासून ‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित झाला, त्या दिवसांपासून बाहुबलीमधील कलाकारांवर नवीन सिनेमांत काम करण्यासाठी ऑफर्सचा पाऊस पडत आहे.

पण यातही अनुष्काला आदित्य चोप्रा, विधू विनोद चोप्रा अशा अनेक बड्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमात काम करण्यासाठी विचारले आहे.

अर्थात अनुष्काने अद्याप एकही ऑफर स्वीकारलेली नाही. तिला योग्य तो निर्णय घ्यायला वेळ हवा आहे. बॉलिवूडमधील पदार्पणासाठी योग्य सिनेमाची निवड करण्याची तिची योजना आहे.

अनुष्काने ‘बाहुबली २’मध्ये देवसेनेची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर लवकरच ‘बाहुबली’ची ‘देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याच्या चर्चा आहेत. बोनी यांनी अनुष्काला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली असून, आता प्रतीक्षा आहे ती फक्त अनुष्काच्या होकाराची. जर अनुष्काने बोनी कपूर यांचा प्रस्ताव स्वीकारलाच तर लवकरच प्रेक्षकांना देवसेनेचा अभिनय हिंदी सिनेमातही पाहायला मिळणार.

LEAVE A REPLY

*