देवळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको

0

देवळा| प्रतिनिधी-शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा व शेतकर्‍यांचे कांदा विक्री करुन मिळालेल्या धनादेशाची रक्कम त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावी या मागणीसाठी आज देवळा येथे पाचकंदिलवर तालुक्यातील माळवाडी व सरस्वतीवाङी येथिल संतप्त नागरिक, शेतकर्‍यांसह तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत माळवाडी व सरस्वतीवाडी येथील शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांनी तहसीलदार व वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, विजवितरण कंपनीकडुन आम्हाला आठ तास वीज दिली जाते. परंतु गेल्या पाच वर्षापासुन ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंत अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो.

यामुळे आम्हा शेतकर्‍यांना पीकांना पाणी देणे मोठे जिकरिचे काम झाले आहे. सद्य स्थितीत आठ तासात प्रत्येक पाच मिनिटाला विजपुवठा बंद केला जातो. व पंधरा- पंधरा मिनिटे बंद राहतो. अशा परिस्थितीत आमचे विजपंप,केबल, फ्युज आदि जळण्याचे व नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नुकसान होते.

नोटबंदीत शेतमालाला मिळत असलेला कमी भाव पाहता शेतकर्‍यांना जगणे मुश्कील झाले आहे. कमी दाबाचा व अनियमीत वीजपुरवढा हा फक्त देवळा तालुक्यातच आहे असा आरोप करित जर वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर आम्हा शेतकर्‍यांना सामुहीक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अन्यथा दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा पुन्हा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या मिळालेल्या धनादेशाचे पैसे दीड ते दोन महीण्यातही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले नाहीत ते त्वरित जमा करावे अन्यथा बँकांना टाळे लावण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीकडुन देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी जि. प. च्या नवनिर्वाचित सदस्या नुतन आहेर, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, सुनिल आहेर, केसरबाई अहिरे, लक्ष्मीकांत आहेर, जितेंद्र आहेर, पंकज आहेर, बंडुनाना आहेर, पंडीत मेधने, जिभाऊ शेवाळे, रामदास आहेर, किशोर खरोटे, विजय आहेर, विनोद आहेर, उमेश आहेर, निलीमा आहेर, विनू आहेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*