‘देवदास’ आता थ्रीडीमध्ये; नवीन रुपात प्रेक्षकांसमोर येणार

0

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘देवदास’ चित्रपट २००२ मध्ये खूप गाजला.

येत्या १२ जुलैला या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण होत आहेत.

या निमित्ताने भन्साळी यांनी ‘देवदास’ एका नवीन रुपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरविले आहे.

हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.

‘मुळात या चित्रपटातील प्रत्येक फ्रेमसाठी अत्यंत बारकाईने काम केलेलं. यातील प्रत्येक दृष्य एका कलाकाराने साकारलेल्या अप्रतिम कलेप्रमाणे आहे.

त्यामुळे थ्रीडी व्हर्जनसाठी हा चित्रपट अतिशय योग्य आहे,’ असं संजय लीला भन्साळी म्हणाले. शाहरूख, माधुरी आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

या चित्रपटातील प्रत्येक दृष्य आता आणखी उच्च दर्जात पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*