दूध, भाजीपाल्यासाठी पोलीस बंदोबस्त

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दूध व भाजीपाला विक्रीची तयारी दर्शविणार्‍या शेतकर्‍यांचा माल बाजार समितीपर्यंत पोहचविण्यासाठी पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या संपाबाबत महाजन यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, संपात सहभागी न झालेल्या शेतकर्‍यांचा माल बाजारात आणण्यासाठी संबधीत शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यास तात्काळ बंदोबस्त देण्यात येईल. जिल्ह्यातील महामार्ग, प्रमुख रस्त्यावरील चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यासाठी जादा पोलीस कुमक मागविली आहे. ज्या भागात अधिक भाजीपाला व दूध उत्पादन होते. तेथून गरज भासल्यास पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांची इच्छा असतांना तो माल विकण्यास विरोध करणार्‍यांवर कडक  कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी महाजन यांनी दिला आहे.धकार्‍यांनी दिली.

बाजार समित्यांना नोटिसा
भाजीपाला व इतर विक्री बंद ठेवणार्‍या जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून नोटिसा पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

*