Type to search

धुळे

दुसाणे येथे युवतीची गळफासाने आत्महत्या

Share

धुळे | साक्री तालुक्यातील दुसाणे येथे युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल घडली. याबाबत निजामपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. माधुरी शांताराम भदाणे (वय १६ रा. दुसाणे ता. साक्री) असे मयत युवतीचे नाव आहे. तिने काल दि. १५ रोजी १.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी बाथरूमच्या पॅसेजमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने तिच्या आईने एकच आक्रोश करत आरडाओरड केली. तेव्हा कुटूंबीय व शेजारी मदतीला धावून आले. माधुरीला खाली उतरवुन जैताणे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात केले असता डॉ. आखाडे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याबाबत निजामपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवतीच्या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही. तपास पोना एस. के. ठाकुर हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!