दुय्यम निबंधक कार्यालयात पिळवणूक

0

मुखत्यारपत्रासाठी शिक्षित कुटुंबाची अडवणूक

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मुखत्यारपत्र करण्यासाठी आलेल्या एका शिक्षित कुटुंबीयाची अडवणूक करण्यात आली असून प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांना न विचारता कार्यालयातील लिपीकच निर्णय घेत असतील तर त्या अधिकार्‍याचा कार्यालयीन प्रमुख म्हणून उपयोग काय? असा सवाल मेज कृष्णा सरदार यांनी व्यक्त केला आहे.

 

 

श्रीरामपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि. 12 जून 2017 रोजी एक शिक्षित कुटुंब यामध्ये चार भाऊ व दोन बहिणी हे शासकीय सेवेत कार्यरत असल्याने त्यांची वडीलोपार्जित असलेली मिळकत राहाता तालुक्यातील चितळी व धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नरडाणा या दोन ठिकाणी असल्याने त्यांच्या थोरल्या भावास मिळकतीचे सर्व अधिकार देण्याचे ठरल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे सर्व दस्तावेज तयार करून ते कार्यालयात पोहचले असता.

 

 

कार्यालयीन अधिकार्‍यांशी चर्चा न करताच संबंधितांना सायंकाळ 4 वाजेपर्यंत बसवून ठेवले. व नंतर लिपीकाने त्यांना सांगितले की, हे काम येथे होणार नाही. तुमची जेथे मालमत्ता आहे. त्याच तालुक्यात हे काम करावे लागणार आहे.

 

 

सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विविध ठिकाणाहून आलेल्या या कुटुंबाला बसवून ठेवण्यात आले. या घटनेची माहिती एक सेवानिवृत्त नायब तहसीलदार व सेवानिवृत्त सुभेदार (माजी सैनिक) यांना समजताच त्यांनी याबाबत कार्यालयात चौकशी केली असता त्याचप्रकारचे जनरल मुखत्यारपत्र दि. 8 सप्टेंबर 2016 रोजी झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबास न्याय मिळवून दिला.

 

 

जर अशाप्रकारे शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांना न विचारता कार्यालयातील लिपीकच निर्णय घेत असतील तर त्या अधिकार्‍याचा कार्यालयीन प्रमुख म्हणून उपयोग काय? असा सवाल मेजर कृष्णा सरदार यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*