Type to search

धुळे

दुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Share

धुळे । दुचाकीसह विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि. 15 रोजी सायंकाळी म्हसदी शिवारात घडली. याबाबत साक्री पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

योगेश नानाजी पवार (वय 25 रा. म्हसदी ता. साक्री) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो काल दि. 15 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना दुचाकीसह विहिरीत पडला. त्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तरूणाला मृत घोषित केले. याबाबत साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!