दीपक मिश्रा देशाचे 45 वे मुख्य न्यायाधीश

0

न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सोमवारी देशाचे 45 वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना पदाची आणि गोपीनितेची शपथ दिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वैकेया नायडू उपस्थित होते.

मिश्रा यांचा कार्यकाळ 13 महिने 6 दिवस असेल. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहर रविवारी निवृत्त झाले. पण शनिवार आणि रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने शुक्रवारी त्यांचा कामाचा अखेरचा दिवस होता. देशाचे मुख्य न्यायाधील बनणारे ते ओडीशाचे तीसरे न्यायाधीश आहेत. याआधी ओडीशाचे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आणि न्यायमुर्ती जीबी पटनायक यांनी देशाच्या मुख्य न्यायाधीशपदी काम केले आहे.

दीपक मिश्रा हे याकुब मेमनच्या खटल्याबाबत दिलेल्या निर्णयामुळे विशेष प्रसिद्धीस आले. या खटल्यात त्यांनी रात्री सुप्रीम कोर्टचे दरवाजे उघडले होते. सकाळी मेमनला फाशी दिली गेली होती.

याशिवाय मिश्रा यांनी 2012 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्भया खटल्यातील आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती.

LEAVE A REPLY

*