दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांची बदली

0

भुसावळ |प्रतिनिधी :  दीपनगर औष्णिक विज प्रकल्पाचे मुख्य अभियंता अभय हरणे यांची मुंबई येथील मुख्यालय प्रकाशगड येथे कोल (कोळसा) विभागाच्या मुख्य अभियंता पदी बदली करण्यात आली असून त्यांंचा प्रभारी पदाभार उममुख्य अभियंता माधव कोठुडे यांच्याकडे देण्यात येणार आहे.तर उममुख्य अभियंता पदावर परळी येथून लक्ष्मण चौधरी येणार आहे.

प्रकल्पाचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी ६ एप्रिल २०१५ रोजी प्रकल्पाची सूत्रे हाती घेतली होती. दरम्यानच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी प्रकल्पात नवनवीन उच्चांक गाठले. दर महिण्याला रेल्वेला देण्यात येणारा लाखो रुपयांचा विलंब शुल्क ०टक्क्यांवर आणने, पीएलएफ(पावर लोड फॅक्टर) १०० टक्केंवर ठेवला.

वीज निर्मितीत उच्चांक गाठला.नागरिकांमध्ये वीज बचतीचा संदेश देण्यासाठी‘ओळख आपल्या विजेची’हा उपक्रम राबविला. प्रकल्पाने क्रिडा,सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमविले. राज्यात पहिल्यांदा वसाहतीत योग भवन,संगीत भवन,पॉवर जीम, ग्रीन जीम, ६०० मीटर जॉगिंग ट्रॅक.नवीन रस्ते, जुन्या इमारतींना रंग रंगोटी, पटांगणावर हिरवळ यासारखे विविध उपक्रम हाताळून कमी काळात ते पूर्ण केले आहे.

आपल्याला जेवढे शक्य होईल ते प्रकल्पाला देण्याचा प्रयत्न केलो.सर्वांच्या सहकार्यांने कामे शक्य झालीे.भविष्यातही परिसराची सेवा करण्याची संधी सोडणार नाही.

Abhay Harne

मुख्यालायातील महत्वाच्या कोळसा विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे. पुढेही सहकार्य ठेवीन.
अभय हरणे
मुख्य अभियंता, दीपनगर प्रकल्प.

संच क्र ३ कार्यान्वित
प्रकल्पातील संच क्र ३ हा तांत्रीक कारणांसाठी बंद होता. दरम्यान या उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता ७-८ दिवस संच क्र ३ सुरु करण्यात आला होता.

मात्र ट्युब लिकेज मुळे बंद असलेला हा संच दि. २३ रोजी दुपारी ४:३० वाजे दरम्यान कार्यान्वित करण्यात आला असून त्यातून विज निर्मिती सुरु आहे. यासह संच क्र ४व५ मधूनही पूर्ण क्षमतेचे विज निर्मिती होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*