Type to search

maharashtra धुळे

दिव्यांगाला अपमानीत करणार्‍या वाहकावर कारवाई करा!

Share
धुळे । दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यान एसटी बसमधून प्रवास करणार्‍या दिव्यांग व्यक्तीला वाहकाने त्याचा हक्क व अधिकार डावलून अपमानीत करून आर्थिक खर्चात टाकले. त्या वाहकावर कायदेशीर कारवाई करून दिव्यांग व्यक्तीला न्याय द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 6 मे रोजी एक दिव्यांग तरूण स्कीझोफनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने तो नंदुरबार येथे उपचाराकरीता दोंडाईचा ते नंदुरबार येथे जाण्यासाठी बसने (क्र. एम.एच.40 एन. 9079) प्रवास करीत होता. तेव्हा वाहक रत्नाकर बागुल यांनी दिव्यांग व्यक्तीला बस प्रवासाचे भाडे सवलत देण्यास नकार दिला. तसेच दिव्यांग व मदतनीस यांना सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक देवून अरेरावीची भाषा वापरली.

दिव्यांगाजवळ 55 टक्के वैद्यकीय प्रमाणपत्र व महामंडळातर्फे देण्यात आलेले अपंग व्यक्तीस 75 टक्के व मदतनीसाला 50 टक्के सवलत पास देखील आहे. तरीदेखील वाहकाने दिव्यांग व्यक्तीला अपशब्द बोलुन, त्यास अपमानीत केले. तरी त्या वाहकावर अ‍ॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील कलम 92 नुसार शिक्षा द्यावी.

तसेच दिव्यांगांना एस.टी बस प्रवासात 75 टक्के व साथीदाराला 50 टक्के सवलत असतांना देखील वाहक हे दिव्यांगांशी प्रत्येकवेळी का-कु करत सवलत देता येणार नाही, असे सांगतात. तरी वाहकांना याबाबात सुचना द्याव्या व दिव्यांगाची सिट ही जिथून एस.टी. प्रवासाला निघते तेथून राखीव ठेवण्यात यावी., अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अ‍ॅड. कविता पवार, इंदुबाई क्षिरसागर, शशिकांत सुर्यवंशी, संजय सोनवणे, रामलाल जैन, दिनेश वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!