दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरांना चांदवडकरांनी दिले पकडून

0

चांदवड| दि. ३ प्रतिनिधी

चांदवड शहरातील डावखरनगर येथील एका घरी दिवसा ढवळ्या चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना नागरिकांच्या सतर्कतेमूळे पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी मुख्तार तांबट यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबट हे गेल्या दोन वर्षापासून डावखरनगरात राहत असून कुटूंबिय लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने ते घरी एकटेच होते.

दरम्यान तांबट हे नेहमीप्रमाणे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले असता, आज दुपारी ११.१५ च्या दरम्यान शेजारील गणेश पगारे यांच्या तांबट यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तशी माहिती तांबट यांना दिली.

ते तात्काळ घटनास्थळी आले असता घरात अज्ञात व्यक्ती घुसले असल्याची चाहूल लागली. दरम्यानच्या काळात शेजारील मंडळींनी तोबा गर्दी केली होती.

उपस्थितांनी संशयितांना घरात का घुसले? अशी विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आल्याने प्रत्यक्षदर्शिंनी संशयित संजय सोनू धाटीया व लिलाबाई धाटीया यांना चोप दिला.

पोलिसांना खबर दिल्यानेत पोलिसांनी हजर होत संशयितांना ताब्यात घेतले.

यावरून दोघांवर चोरीचा प्रयत्न करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत

LEAVE A REPLY

*