‘दिल दोस्ती दोबारा’मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

0

‘चुकभूल’ द्यावी घ्यावी या मालिकेनंतर आता आणखी एक रसिकांची आवडती मालिका छोट्या पडद्यावरुन निरोप घेणार आहे.

‘दिल दोस्ती दोबारा’ आता रसिकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेच्या जागी येत्या १४ ऑगस्टपासून ‘जागो मोहन प्यारे’ ही नवी विनोदी मालिका रसिकांच्या भेटीस येणार आहे.

कोणत्याही गंभीर, विचार करायला लावणा-या मालिकांपेक्षा रसिकांना हलक्या फुलक्या, विनोदी, खळखळून हसवणा-या आणि धम्माल मनोरंजन करणा-या मालिका पाहायला आवडतात.

हीच बाब लक्षात घेऊन ‘जागो मोहन प्यारे’ ही नवी विनोदी मालिका लवकरच रसिकांचं मनमुराद मनोरंजन करण्यासाठी दाखल होत आहे.

या मालिकेतून एका बिच्चा-या नव-याची कथा आणि व्यथा विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

अभिनेता अतुल परचुरे हे या मालिकेत नव-याची भूमिका साकारत आहेत. नव-याला आपल्या तालावर नाचवणा-या पत्नीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी साकारली आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेत राधा ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री श्रृती मराठे ही सुद्धा या मालिकेत विशेष भूमिका साकारत आहे. श्रृती या मालिकेत बायकोपासून हैराण असलेल्या पतीला मदत करणा-या परीच्या भूमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

*