Type to search

क्रीडा

दिल्लीला 179 धावांचे आव्हान

Share
जयपूर । दिल्ली आणि कोलकाता यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. शुभमन गिलचे अर्धशतक (65) आणि आंद्रे रसलची फटकेबाजी (45) यांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे 179 धावांचे आव्हान दिले.

कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या फ्री हिटवर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत फ्री हिटचा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 30 चेंडूत 28 धावा केल्या.

शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने 12 चेंडूत 11 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला.

गिलने 39 चेंडूत दमदार 65 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक 2 धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत 45 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट 6 धावांवर बाद झाला.शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या 6 चेंडूत 14 धावांच्या जोरावर कोलकाताने 178 धावांपर्यंत मजल मारली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!