Type to search

क्रीडा

दिल्लीला 169 धावांचे आव्हान

Share
नवी दिल्ली। घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सला 168 धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा उलटला. चांगली सुरुवात झाल्यानंतरही, मधल्या फळीत भागीदारी न होऊ शकल्यामुळे मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली.

रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला.

यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आलं. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत मुंबईला धावांचं आव्हान गाठून दिलं. तुफानी फॉर्मामध्ये असलेल्या हार्दिक पांड्या (15 चेंडूत 32) आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्याने (26 चेंडूत 37) केलेल्या तुफानी फटकेबाजीने मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले. पांड्या बंधूनी शेवटच्या पाच षटकांत 64 धावा कुटल्याने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. दिल्लीकडून रबाडाने दोन बळी घेतले, तर अक्सर आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित (30) आणि डिकॉकने (35) मुंबईला तुफानी सुरुवात करून दिली, पण चांगल्या सुरवातीचा फायदा दोन्ही खेळाडूंना घेण्यात अपयश आले.सूर्यकुमार यादव आणि कृणालने आणखी पडझड होऊ न देता धावफलक हलता ठेवला. सूर्यकुमारही चांगल्या सुरवातीचा फायदा अपयशी ठरला.

तो 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर पांड्यांनी बंधूनी दिल्लीवर चाल करून मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!