दिल्लीत McDonald’s च्या 1700 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ

0

55 पैकी 43 दुकाने बंद

जगातील प्रसिद्ध फास्टफूड चेन्सपैकी एक मॅक्डोनल्डवर दिल्लीत संकट ओढावले आहे.
येथे मॅकडीची 55 पैकी 43 दुकाने बंद करण्यात आली आहेत. लायसन्सची मुदत संपल्यामुळे ही दुकाने बंद झाली आहेत.
यामुळे तब्बल 1700 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात फास्टफूड चेन चालवणारी भारतीय कंपनी कनॉट प्लाझा रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅकडोनल्डमध्ये वाद झाल्यानंतर ही परिस्थिती ओढावली असे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसारित केले होते.
भारतीय कंपनीने मॅकडीला कोर्टात खेचले होते.
मात्र, स्कायपेवर झालेल्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला असे मॅकडीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यासोबतच, या बंदीमुळे कर्मचाऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत असे आश्वासन सुद्धा कंपनीने दिले.

LEAVE A REPLY

*