दिल्लीत मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी

0

नवीदिल्ली |  वृत्तसंस्था  :  राज्यात सत्ताधारी सेना-भाजपमध्ये कोंडी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यामुळे या भेटीनंतर भाजप काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले.

मुख्यमंत्री आज पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. मात्र या बैठकीच्या निमित्ताने मुंबईतील महापौरपदाबाबतची चर्चा होणार आहे.

भाजपच्या मदतीशिवाय अन्य कुणाचेही सहकार्य घेऊन मुंबई महापालिकेचे महापौरपद मिळवायचे, असा निर्धार शिवसेनेने केल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील कोंडी कायम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचीही भेट घेणार असल्याचं समजतंय. भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे.

त्यामुळे देवेंद्र ङ्गडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान, मुख्यमंत्री कोस्टल रोडसंदर्भात पर्यावरण मंत्री अनील दवेंसोबत बैठक घेणार आहेत.

याशिवाय राज्यातील साखर प्रश्‍नाबाबत ते केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.

LEAVE A REPLY

*