दिल्लीतील मराठी वृत्तविभाग मुंबईत हलवणार

0

दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी मराठीतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे बंद करण्यासाठी १२ जूनचा मुहूर्त ‘प्रसारभारती’ने काढल्याचे समजते.

त्यामुळे दिल्ली आकाशवाणी केंद्रातील मराठीचा राष्ट्रीय वृत्तविभाग मुंबईत हलविण्याची औपचारिकता फक्त उरली आहे. ५ जूनपासून मुंबईहून बातमीपत्रे प्रक्षेपित होतील.

केवळ मराठीच नव्हे, तर दिल्लीतील चौदा प्रादेशिक भाषांचा राष्ट्रीय वृत्त विभाग त्या त्या राज्यांच्या राजधानीत हलविण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे.

त्याची अंमलबजावणीही चालू झाली असून आतापर्यंत आसामी, उडिया, मल्याळी आणि तमीळ बातमीपत्रे हलविली गेली आहेत. आता पुढचा क्रमांक मराठी व गुजरातीचा आहे.

तांत्रिकदृष्टय़ा सोमवार, दि. ५ जूनपासूनच दिल्ली आकाशवाणीवरून प्रक्षेपित होणारी मराठी बातमीपत्रे बंद होतील. कारण ५ जूनपासून मुंबईहूनही बातमीपत्रे प्रक्षेपित होतील.

एका आठवडय़ाच्या चाचणीनंतर दिल्लीतील मराठी प्रादेशिक विभाग कायमचा बंद होईल,’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*