दिपक गुप्ता मुंबई पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव, |  प्रतिनिधी :  जळगावातील दिपककुमार गुप्ता याला मुंबई पोलीसांनी जळगावातून ताब्यात घेतले. मुंबईतील एका महिला आमदाराला अश्‍लिल मॅसेज पाठविल्याचा संशय गुप्ता यांच्यावर असल्याचे मुंबई पोलीसांनी सांगितले.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगावातील शिवाजीनगरमधील रहिवाशी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार प्यारेलाल गुप्ता यांच्यावर मुंबई येथील विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये गुरनं ६४/२०१७ नुसार भादंवि कलम ५०७,५०९, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७(अ) नुसार गुन्हा दाखल आहे.

यामध्ये तक्रारदार ह्या महिला आमदार आहेत. त्यांना अश्‍लिल मॅसेज दीपक गुप्ता यांच्या भ्रमणध्वनीवरुन आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक चौकशीमध्ये गुप्ता यांचे नाव समोर येत आहे. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई विलेपार्ले पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विकास पाटील,पोहेकॉ पी.एन.शिंदे, पोहेकॉ अडकमोल यांचे पथक आज सकाळी जळगावात आले होते.

विलेपार्ले पोलीसांनी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. संबधीत प्रकाराची ठाणे अंमलदाराला डायरीवर नोंद घेवून गुप्ता यांच्या पत्नीला दीपक गुप्ता यांनी गुन्ह्यातील चौकशी कामी विलेपार्ले येथे घेवून जात असल्याची नोटीस पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिली. त्यानुसार कायदेशीर पुर्तता करुन गुप्ता यांना रेल्वेने विलेपार्ले येथे घेवून गेले.

LEAVE A REPLY

*