दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पुढील चित्रपटात ऐश्वर्या?

0

ऐश्वर्या लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट साईन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मणिरत्नम व ऐश्वर्या या दोघांनी ‘गुरु’ व ‘रावण’ सारखे उत्कृष्ट सिनेमे दिले आहेत.

आता ही जोडी पुन्हा एकदा बॉक्सआॅफिसवर धमाका करण्यास तयार आहे.

कान्स फेस्टिवलदरम्यान मीडियाशी बोलताना ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या चित्रपटाबद्दलचे संकेत दिले होते. मी अलीकडे अनेक चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आहे. यापैकी दोन चित्रपटांची स्क्रिप्ट मला आवडली आहे, असे तिने सांगितले. गत आठवड्यात मी काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट ऐकल्या. यापैकी दोन मला आवडल्या. हे चित्रपट मी साईन केलेच तर तुम्हाला नक्की कळेल, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली होती.

ऐश्वर्याला ज्या दोन स्क्रिप्ट आवडल्या, त्यापैकी एक मणिरत्नम यांची आहे. ऐशच्या एका निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसू शकते. हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा असेल. हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषेत तो तयार होईल. दीर्घकाळापासून ऐश्वर्या व मणिरत्नम यांच्यात या चित्रपटांवरून चर्चा सुरु होती.

LEAVE A REPLY

*