दारु दुकानांच्या स्थलांतराबाबतची अट शिथील

0
जळगाव / मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरीत करण्याबाबतच्या अटीं नव्या परीपत्रकानुसार शिथील करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता दुकाने स्थलांतर करतांना स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीसांच्या ना हरकत दाखल्याची गरज नसल्याने मद्य व्यावसायिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत 500 मिटर आत असलेल्या मद्य विक्रीला दि. 1 एप्रिलपासून बंदी घालण्यात आली होती.

त्यामुळे काही मद्य व्यावसायिकांनी रहीवास क्षेत्राकडे मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी मोर्चा वळविला होता. मात्र रहीवास क्षेत्रातील नागरीकांकडुन त्यास तीव्र विरोध झाल्याने मद्य व्यावसायिकांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती.

दरम्यान स्थलांतरासंदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे आज नवे परीपत्रक जारी केले. यात बाधीत झालेल्या मद्य विक्री व्यावसायिकांसाठी त्या क्षेत्रात मद्य विक्री कार्यरत असल्यास पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ना हरकत दाखल्याची अट शिथील करण्यात आली आहे.

त्यामुळे आता रहीवास क्षेत्रातही मद्य विक्री व्यावसायिकांना दुकाने स्थलांतरीत करता येणार असुन स्थलांतराबाबतची सर्व प्रक्रिया पुर्ण करून त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शासनाच्या या नव्या परीपत्रकानुसार मद्य विक्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*