दारुबंदीकडे बहुसंख्य ग्रामपंचायतींचा कानाडोळा

0
ग्रामरक्षकदलासाठी केवळ 126 गावांचेे प्रस्ताव दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – वाढत्या व्यसनाधीतेला आळा घालण्याच्या उद्देशाने गाव तिथे ग्रामरक्षकदल स्थापन करण्याचा शासन निर्णय असताना प्रस्ताव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यत केवळ 126 ग्रामपंचायतींने दारुबंदी ठराव घेवून संबधित प्रांताधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
महारा्र दिनी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामसभामध्ये ग्रामरक्षकदल स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारा ठराव संमत करण्याकडे बहुसंख्य ग्रामपंचायतीने कानाडोळा केल्याचे प्राप्त प्रस्तावानूसार उघड झाले आहे.दरम्यान जिल्ह्यात दारुबंदी होण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेशालाही अनेकांनी वाटाण्याच्या अक्षदा दाखविणेच पसंत केले.
दारुबंदी संदर्भातील जिल्हाधिकार्‍यांचा आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्ङ्गत जिल्ह्यातील गावांना देण्यात आला. त्यानूसार अंमलबजावणी अपेक्षित असताना दारुबंदीच्या विरोधात पुढे येण्याचे धाडस अद्यापही अनेक गावे करत नसल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने महारा्र ग्रामरक्षक दल नियम 2017 नूसार तयार केले.ग्रामरक्षक दलाची सदस्य हेणारी व्यक्ती दारु पिणारी नसावी, ग्रामरक्षक दलाने गावात होणार्‍या अवैध दारुविक्रीवर लक्ष ठेवणे, काही आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला कळवावे लागणार आहे. ग्रामरक्षक दलातील सदस्यांच्या नावाचा प्रस्ताव तहसिलदारामार्ङ्गत प्रांताधिकार्‍यांकडे जावून त्यानंतर ग्रामरक्षक दल नियुक्तीचा आदेश देण्यात येणार आहे.
श्रीरामपूर,शेवगाव सर्वाधिक तर, चार तालुक्यात झिरो
ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत ग्रामपंचायतीने पारित केलेल्या ठरावाच्या प्रतिसह नमुना अ किंवा नमुना ब मध्ये अर्ज उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या ग्रामपंचायत्ींची संख्या अशी-संगमनेर-17, राहुरी, नगर प्रत्येकी -1, श्रीरामपूर-30, नेवासा-9, शेवगाव-40, कर्जत-2, श्रीगोंदा-15, पारनेर-11 अशा एकुण 126 ग्रामपंचायतींनी प्रातांधिकार्‍यांकडे 15 मे अखेरपर्यत प्रस्ताव दाखल केल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी दिली.

LEAVE A REPLY

*