दारुड्यांकडून भापकर गुरूजींना मारहाण

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – दारुबंदीच्या ठरावावरून गुंडेगावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्यावर गावातीलच दोघांनी हल्ला करत लाथा बुक्यानी मारहाण केली.

ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास गुंडेगावातील चौकात घडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले आहे.

कोतकर व भापकर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

गावात बहिरोबाची यात्रा होती. यात्रेत गावातील काही तरुण मद्य प्राशन करून आले होते.

दारू पिणे घातक असल्याचे सांगत गुरूजी त्यांना चौकात समजावून सांगत होते.

गावाने 1 मे रोजीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला असता तर बरे झाले असते असे गुरूजी म्हणाले. त्याचा राग येऊन दोघांनी गुरूजींवर हल्ला करत मारहाण केली.

या प्रकरणी भापकर गुरूजी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी दोघांविरुध्द मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*