दारणा धरणात अर्धा टीएमसी पाणी

0
अस्तगाव (वार्ताहर) – दारणा धरणाच्या पाणलोटात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून येणार्‍या जोरदार सरींनी धरणाचा साठा फुगू लागला आहे. दारणातील पाणी साठा अर्धा टीएमसी झाला आहे. भावलीचा साठा 206 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. काल मंगळवारी या दोन्ही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे या दोन्ही धरणांच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होणार आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर 15 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. 25 जूननंतर वरुण राजाने तेथे मनावर घेतल्यानंतर दमदार पावसाने विशेषत: इगतपुरी तालुक्यातील पावसाने दारणा,  भावली या धरणांचे पाणी साठे वाढू लागले आहेत. काल मंगळवारीही या धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होणार आहे. 25 ते 27 जून सकाळी 6 पर्यंत दारणात 250 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे हा साठा 505 दशलक्ष घनफूट म्हणजेच अर्धा टीएमसीवर पोहचला आहे. 7.1 टीएमसीच्या या धरणात 7.6 टक्के पाणीसाठा हा काल सकाळपर्यंत झाला होता. शेजारील भावली धरणाचा उपयुक्त साठा 25 जूनपूर्वी 137 दशलक्ष घनफूट होता. त्यानंतर तीन दिवसानंतर तो 206 दशलक्ष घनफूट झाला आहे. भावली परिसरात मंगळवार सकाळी 6 पर्यंत 24 तासांत 27 मिमी पावसाची नोंद झाली होती.
गंगापूर धरणाचा पाणीसाठा दोन दिवसांपासून स्थिर आहे. 5630 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 1264 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून तो 22.45 टक्के आहे. मुकणेचा उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आहे. गौतमी 5.44 टक्के, वालदेवी 5.44 टक्के, कडवा एक टक्का, नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात 248 दशलक्ष घनफूट (96.49 टक्के) पाणीसाठा आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

वाकी तलाव निम्मा

भंडारदरा (वार्ताहर) – सोमवारच्या तुलनेत मंगळवारी भंडारदरा पाणलोटात पावसाने काहीसा जोर धरला आहे. 112 दलघफू क्षमता असलेल्या वाकी तलावात50 टक्के पाणीसाठा झाला आहे.
भंडारदरा धरणात गत 24 तासांत केवळ 33 दलघफू पाणी दाखल झाले. पण धरणातून विसर्ग 1213 
करण्यात आल्याने भंडारदर्‍यातील पाणीसाठा काहीसा कमी होत आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 2175 दलघफू झाला होता. दरम्यान, काल मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. या पावसाची नोंद 11 मिमी झाली आहे. पावसाळी वातावरण टिकून असून वातावरणात गारवा आहे. पर्यटकांची गर्दीही वाढत आहे.
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटात पावसाळी वातावरण असले तरी फारसा पाऊस नाही.

भंडारदरा पाऊस (मिमी)

भंडारदरा, 05भंडारदरा, 05घाटघर, 18पांजरे, 10रतनवाडी, 22वाकी 07

LEAVE A REPLY

*