दानवे यांच्या बेताल वक्तव्याचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

0

संगमनेर (प्रतिनिधी) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. शहरातील बस स्थानकासमोरील चौकात रावसाहेब दानवे यांच्या फोटोला चपलाचा हार घालून व जोडे मारुन निषेध नोंदविण्यात आला.
रावसाहेब दाणवे यांनी शेतकर्‍यांबद्दल जे अपशब्द वापरले तसेच शेतकर्‍यांच्या कर्ज माफीवर ‘जर शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले तर शेतकरी आत्महत्या करणार नाही का? याची लेखी हमी द्या’ असे रावसाहेब दावणे यांनी म्हटले. म्हणून या सर्व गोष्टींचा शिवसेनेच्यावतीने काल गुरुवारी निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, उपशहरप्रमुख पप्पू कानकाटे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, नगरसेवक लखन घोरपडे, रमेश काळे, कैलास कासार, इम्तीयाज शेख, फैजल सय्यद, ग्राहक संरक्षण प्रमुख ज्ञानेश्‍वर कांदळकर, सचिन साळवे, अपंग सेना जिल्हा प्रमुख जालिंदर लहामगे, राजेंद्र सोनवणे, राजू सातपुते, ऋषिकेश शिंदे, बाळू कवडे, नरेश माळवे, मोहाळे, त्रिलोक कतारी, दिनेश फटांगरे, मनोज परदेशी, राहुल अभंग, बंडू म्हाळस, यादव आदी उपस्थित होते. 

अहमदनगर (प्रतिनिधी)- तूर खरेदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबद्दल वापरलेल्या असंसदीय भाषेचा निषेध अहमदनगर शहर शिवसेनेने केला. दानवे यांचा पुतळाही सेनेने यश पॅलेस चौकात जाळला. दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष व खासदार पदाचा राजीनामा देण्याची मागणी सेनेने यावेळी केली.
सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने सकाळी यश पॅलेस चौकात हे आंदोलन केले.
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच शासनाने तूर खरेदी बंद केली. शेतकर्‍यांची लाखो टन तूर बाजार समितीच्या आवारात पडून आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असताना शासन तूर खरेदीबाबत उदासिनता दाखवित आहे. असे असतानाही प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जालना येथे शेतकर्‍यांबद्दल असंसदीय शब्द वापरले. त्याचा निषेध म्हणून अहमदनगर शहर सेनेने दानवे यांचा पुतळा जाळला. शेतकर्‍यांबद्द यापुढे काही बोलाल तर सेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा सेनेचे जिल्हाध्यक्ष गाडे यांनी यावेळी दिला. शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, रामदास भोर, संदीप गुंड, प्रवीण कोकरे, राजू भगत यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. तसेच तहसिलदार यांना निवेदन देऊन देण्यात आले.
रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाईची मागणी आणि दानवे यांचा निषेध करत काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी नायब तहसिलदार सीताराम आल्हाट यांना निवेदन दिले.
यावेळी श्रीगोंदा सेवा संस्था अधयक्ष पोपटराव बोरुडे , नितीन दांडेकर , मयूर मोटे , अतुल कोठारे , संतोष काळाने , प्रसाद इंगळे आदी उपस्थित होते.

शिर्डी (प्रतिनिधी)- भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवें यांनी तुरडाळ संदर्भात शेतकर्‍यांवर केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल शिर्डीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नानासाहेब बावके यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतिमेला जोडेू मारो आंदोलन करून प्रतीकात्मक पोस्टरचे दहन केले.
जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. तसेच दानवेच्या नावाने मुर्दाबाद अशाही घोषणा दिल्या. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
या प्रसंगी शिवसेनेचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब बावके म्हटले कि, शेतकर्‍यांबाबत दानवेंनी जे तारे तोडले याबद्दल राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत, त्याचप्रमाणे त्यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करा अन्यथा सेना स्टाईलने उत्तर देऊ. यावेळी राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी, पुंडलिक बावके, सागर कोते, दादा गुंजाळ, राहुल बावके, गणेश वाणी, उमेश पाटील, कुणाल मुद्लीयार, गणेश गायके, किशोर शिखरे, अभी जेजुरकर, शुभम ताम्हणे, संदीप बावके आदी उपस्थित होते.

पाथर्डी (प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांच्या तूर खरेदी प्रश्ना संदर्भात जालना येथे काल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नाईक चौकात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल कराळे, तालुका उपप्रमुख रफिक शेख, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, दत्तात्रय दराडे, भागीनाथ गवळी, एकनाथ झाडे, उद्धव दुसुंग, शिवाजी कराळे, अब्बास शेख आदी उपस्थित होते. 

रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍याबद्दल वापरलेल्या असंसदीय भाषेच निषेध करत. नगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दानवे यांच्या प्रतिमेस ‘ जोडो मारो आंदोलन केले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, महिला अध्यक्षा रेश्मा आठरे, सारंग पंधाडे, ऋषी ताठे, काजिम शेख, प्रकाश भागानगरे, गुड्डू खताळ, बाबासाहेब गाडळकर, किरण पंधाडे, अमित भूतकर, नितिन लिगडे, राहुल ठोंबरे, शुभम टाक, संजय खताडे, राहुल सांगळे, अमर पठारे, भाऊ सुपेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*