दानवेंच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर

0

निषेधाच्या घोषणा,  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – तूर खरेदीवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍याबद्दल वापरलेल्या असंसदीय भाषेच्या निषेधार्थ नगर शहर जिल्हा काँगे्रस शुक्रवारी रस्त्यावर उतरली. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.
गुरुवारी शहर शिवसेनेने सक्कर चौकात दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्या पाठोपाठ नगर शहर काँगे्रस रस्त्यावर उतरली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी, उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देणारा हमी भाव व शेतमालाच्या शासकीय खर्चाची तरदूत सरकारमार्फत करुन द्यावी, अशी मागणी कॉग्रेसकडून करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी जि.प सदस्य बाळासाहेब हराळ, बाळासाहेब भुजबळ, आर.आर पिल्ले, सविता मोरे, गौरव ढोणे, मुन्ना चमडेवाले, शेख, बाळासाहेब भंडारी, शाम वाघस्कर, साहिल शेख, सत्रे, शेख, रजनी ताके, सुनीता बागडे, जाहीदा शेख उपस्थित होते.

राज्यभर निषेध
कॉगे्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार राज्यभरातील कॉग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून दानवेंच्या विरोधात निषेध नोंदविला. दानवेंच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली आहे. यापुर्वी अनेकदा त्यांच्याकडून याप्रकारचे अपशब्द उच्चारले असल्याचे नगर शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले.

‘साले’पदवी त्यांनाच शोभेल
‘साले’ ही पदवी धारण करण्याची आपली पात्रता नसल्याची शेतकर्‍यांची भावना आहे. त्या ऐवजी खासदार दानवे यांच्या सारख्या कर्तृत्ववान माणसालाच शोभुन दिसेल असे बळीराजाचे मत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*