Type to search

नंदुरबार

दादासाहेबांनी तयार केलेल्या आराखड्याला मूर्त स्वरुप देणार: शिरीष नाईक

Share

नवापूर । वि.प्र. – नवापूर मतदार संघात आ.दादासाहेब सुरूपसिंग नाईक यांनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला आहे. त्यांनी तयार केलेल्या आराखडयाला मुर्तीमंत स्वरूप देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मला विजयी करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीषकुमार नाईक यांनी केले.

श्री.नाईक म्हणाले, नवापूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी व्हीजन आवश्यक असते. माझ्याकडे ते आहे. आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी माझा प्राधान्यक्रम असेल. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी मी अग्रक्रम देईल. नवापूर विधानसभा क्षेत्रात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. गेल्या उन्हाळयात नवापूर व परिसरात पिण्याच्या पाण्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर त्रास झाला. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रंगावली धरण ते नवापूर धरण अशी स्वतंत्र जलवाहिनी टाकून नवीन जलसिंचन योजना राबवून नवापूर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल. विविध आजारांवर रूग्णांवर उपचार करता यावे. या हेतुने मतदारसंघात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, व्यापारी वर्गासाठी योग्य व आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर राहणार आहे.

सध्याचे युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासाठी नियमीत वीज पुरवठा होईल व जिथे वीज पोहोचली नाही, अशा ठिकाणी वीजेची सोय उपलब्ध करून दिली जाईल. तरूणांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावे, म्हणून जास्त व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व स्पर्धात्मक परीक्षाला तयारीसाठी अभ्यास केंद्राची उभारणी करणार आहे. मतदार संघातील शेतकर्‍यांना आर्थिक दृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल. तसेच शेती विकासासाठी अल्पदरात अर्थसहाय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुलींसाठी स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण, ग्रामीण भागात घर तेथे नळ, नळ तेथे पाणी,

शासकीय योजनांच्या लाभ व त्यांच्या कागदपत्रांची उपलब्धता करण्यासाठी मदत केेंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार, सर्व वाडया वस्त्या व पाडे बारमाही पक्के रस्त्यांनी जोडणार, एकंदरीत शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, रोजगार व समाजकारण हे माझ्या आवडीचे विषय आहे. म्हणून दुर्दशी विचार करून आणि आमच्या घरातील राजकीय शिदोरीचा अनुभव नवापूर मतदार संघासाठी व समाजकार्यात उपयोगात आणण्यासाठी मला नवापूर विधानसभा मतदार संघात निवडून सेवेची संधी द्यावी. असे आवाहन शिरीषकुमार नाईक यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!