दाखले मिळणार वेळेत, प्रशासन सज्ज

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नवीन शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्याची विविध दाखले मिळविण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन यंदा वेळेत दाखले मिळावेत यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सेतू समिती व महाऑनलाईन यांच्यामार्फत महाईसेवा केंद्र धारकांची कार्यशाळा घेण्यात आली. आगामी काळात इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास दाखला, अल्पभूधारक असल्याबाबतचा दाखला आदी प्रकारचे दाखले महा ई सेवा केंद्रामार्फत दिले जातात, त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन विद्यार्थ्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी उपस्थितांना डिजीटल इंडीया व कॅशलेस व्यवहार यासंदर्भात प्रबोधन केले. यावेळी महसूलच्या उपजिल्हाधिकारी साधना सावरकर, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, सामान्य प्रशासनचे तहसीलदार गणेश मरकड, सदाशिव शेलार, महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक निरज शेकटकर, रवींद्र मांगूळकर उपस्थित होते.

महाई सेवा केंद्र चालकांना सूचना
दाखल्याच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्र व अर्जासह स्वीकारुन तहसील कार्यालयाकडे द्यावेत, दाखले व यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावून त्यानुसार नागरिकांकडून शुल्क घ्यावे व त्याची पावती द्यावी, वरिष्ठ कार्यालयाकडे अर्जदारांना पाठवू नये, परवानगी मिळालेल्या ठिकाणीच महाईसेवा केंद्र सुरु ठेवावे, नागरिक, विद्यार्थी व पालक यांच्याशी नम्रपणे सुसंवाद साधावा.

तीन महा ई सेवा केंद्र चालकांचा सत्कार
जानेवारी ते एप्रिल 2017 कॅशलेस व्यवहारातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजेंद्र पंडित, ज्ञानदेव मिसाळ (नेवासा) व दीपक म्हस्के (शेवगाव) यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊनढ सन्मान करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*