दहीहंडीच्या याचिकेवर 7 ऑगस्टला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार

0

दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.

सुनावणीत दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

तसंच 7 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे.

2014 मध्ये हायकोर्टानं दही हंडीच्या उंचीवर आणि त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या वयावर निर्बंध लादले होते.

वीस फूट उंचीसह गोविंदाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता.

सण व संस्कृती जपण्याच्या सबबीखाली आयोजकांनी सरकारला हे नियम शिथिल करण्यासाठी साकडं घातलं आहे. मात्र सध्यातरी सरकारच्या हाती काहीच नसल्याने सरकारनेही नियमांत बदल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

LEAVE A REPLY

*