दहा दिवसांत राहात्याची सरासरी ‘पासष्टी’वर

0

नेवासा, कर्जत तालुक्यातही ‘मृग’ची मेहरबान, मुळा धरणात नव्याने पाणी

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा मृग नक्षत्र नगरकरांवर चांगलेच मेहरबान झालेले आहे. कारण गतवर्षी याच दहा दिवसांत सरासरी केवळ 6.67 टक्के पाऊस झाला होता. पण यंदा हे प्रमाण आजअखेर 31.40 टक्क्यांवर पोहचले आहे. राहाता तालुक्यात पावसाने दाणादाण उडविली आहे.

 

 

या तालुका सरासरीत सर्वाधिक आघाडीवर असून पावसाची नोंद 64.74 टक्क्यांवर पोहचली आहे. त्या खालोखाल नेवाशात पावसाने यंदा चांगला आधार दिला आहे. मात्र अकोले आणि संगमनेर अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

 

 

यंदा सर्वच तालुक्यात सर्वदूर कमी अधिक पाऊस झाला आहे. श्रीरामपूरच्या पूर्वभागात, राहात्यात अस्तगाव व अन्य भाग, श्रीगोंदा, पाथर्डीत ओढे-नाल्यांना पूर आला होता. परिणामी बंधारे तुंडूब झाले आहेत. त्यामुळे जिथे वापसा झाला आहे. त्या ठिकाणी पेरण्यासही वेग आला आहे.

 

 

राहाता तालुक्यात चारपाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. कालही अस्तगावात धो-धो पाऊस झाला. कर्जत तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. नगर शहर व परिसरातही गत आठ दिवसांपासून दरम्यान, पाणलोटातील हरिश्‍चंद्र गड, कळसूबाईचे शिखरावर मान्सून अद्यापही सक्रिय नसला तरी पारनेर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मुळा धरणात 158 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे.

 

 

त्यामुळे 4851 दलघफूवर असलेला पाणीसाठा आता 5009 दलघफू झाला आहे. घाटशीळ धरणात 10 दलघफू तर घोड धरणातही काहीशी पाण्याची आवक झाली आहे.

 

आतापर्यंत नोंदलेला पाऊस (टक्के)
तालकानिहाय ः राहाता 64.74, नेवासा 43.67, कर्जत 43.39, नगर 38.91, पारनेर 35.03, राहुरी 32.65, श्रीगोंदा 32.10, श्रीरामपूर 29.79, जामखेड 27.99, शेवगाव 26.47, पाथर्डी 25.5, कोपरगाव 20.79, संगमनेर 12.48,अकोले 6.89.

 

घाटघरला 2 इंच पाऊस
भंडारदरा (प्रतिनिधी)- भंडारदरा धरण पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघरमध्ये 55 मिमी पाऊस झाला. पांजरे 9, रतनवाडी 13 मिमी पाऊस झाला. पण अजूनही या भागात मान्सून सक्रिय झाला नसल्याने धरणात नवीन पाण्याची आवक फारशी झालेली नाही.

LEAVE A REPLY

*