दहावीतही मुलींनीच मारली बाजी

0
जळगाव । दि.6। प्रतिनिधी – माध्यमिक उच्च माध्ययमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे.
नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याचा निकाल 87.78 टक्के लागला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
परंतु यंदा देखील मुलींनींच बाजी मारली असून सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहे.

जिल्ह्यातुन 54 हजार 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जळगावच्या ए.टी.झांबरे विद्यालयातील स्नेहा झांबरे व जागृती पाटील या विद्यार्थींनींना 99 टक्के गुण मिळाले आहे.

तर सेंट लाँरेन्स विद्यालयातील देविका चौधरी या विद्यार्थीनीने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 60 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पारोळा 92.29, अमळनेर 91.34, धरणगाव 90.57 या तालुक्यांचा लागला तर सर्वात कमी 69.27 टक्के निकाल बोदवड तालुक्याचा लागला.

निकाल जाहीर झाल्याचे माहित पडताच विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेंवर गर्दी केली होती. तर बर्‍याच विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच निकाल पाहिला.

जिल्ह्यातून 61 हजार 825 विद्यार्थी परिक्षेला बसलेले होते.त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जिल्ह्यातून 25 हजार 760 मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी 90.71 इतकी आहे तर 30 हजार 901 मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी 85.68 टक्के इतकी आहे.

LEAVE A REPLY

*