दसक शिवारात युवकाचा खून

0

नाशिक, ता. ८ : दसक शिवारातील सायट्रिक इंडिया कंपनीच्या खुल्या जागेत काल रात्री उशिरा डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आला.

सकाळी ही घटना उघडकीस आली. पप्पू यादव पाटील (वय ४०) असे मृताचे नाव असून पोलिस काही जणांकडे चौकशी करत आहेत.

दरम्यान मृत यादव हा बेरोजगार असून व्यसनी होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याला आधीच सोडून गेली होती. त्याचे आईवडिलांशीही सतत भांडणे होत असत. अशी माहिती पोलिस तपासात समजली आहे.

यासंदर्भात लवकरच काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*