दसकला दगडाने ठेचून एकाचा खून

0

नाशिकरोड | दि. ८ प्रतिनिधी
दसक परिसरातील एका कंपनीच्या परिसरात एका इसमाचा अज्ञात कारणातून दगडाने डोके ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.७)मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलीसांनी काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पप्पु यादव (३५, नारायणबापुनगर, जुना सायखेडा रोड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दसक परिसरातील सायट्रीक कंपनीच्या परिसरातील पडीत मोकळ्या भुखंडावर एका अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती आज पहाटे या परिसरातील नागरीकांनी पोलीसांना दिली.

माहिती समजताच पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहाक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पंढरीनाथ ढाकणे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी यावेळी श्वान पथकाला पाचारण करीत संशयीतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

ही घटना वार्‍यासारखी पसरताच नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात संशयीतांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मयत इसमाचा शोध घेतला असता हा मृतदेह पप्पु यादव याचा असल्याचे समोर आले.

तो सतत दारू पित असल्याने वाद विवाद होऊन त्याची पत्नी त्यास सोडून गेली होती. यामुळे तो सतत नशेत असे अशात त्याचा कोणी खून केला याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलसांना मिळालेल्या काही माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील काही संशयीतांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*