दर्शनासाठी वाढली गोदाघाटावर गर्दी ; सकाळपासूनच पर्यटकांची हजेरी, राज्यभरातून वाहने दाखल

0

नाशिक : नवीन वर्षाचे औचित्य साधून सकाळपासून गोदाघाटावर पर्यटकांनी गर्दी केल्याने मंदिरांचा परिसर फुलून गेला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविक कायम असल्याने याठिकाणी वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

बारावीची परिक्षा संपल्यानंतर आता पर्यटकांची नाशिकमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी होवू लागली आहे. त्यातच गुढीपाडवा अर्थात मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून अनेकांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याने गोदाघाट, रामकुंडांचा परिसर गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसले. केवळ नाशिकमधून नव्हे तर मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापुर सह गुजरात आदी भागातूनही पर्यटकांनी गर्दी केली.

पहाटेपासूनच या भागात वाहनांची गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. दरवर्षी होणारी ही गर्दी लक्षात घेत गोदाघाट परिसरात असलेल्या मंदिरात सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळा, मंदिरातील गाभाराही सजविण्यात आला होता. सध्या बारावीच्या परिक्षा संपल्याने पालकही विश्रांती घेत आहेत त्यामुळे विरंगळा म्हणून नाशिमधील देवदेवता तसेच त्रयंबकेश्वरकडे भेट देण्याचे प्रमाण वाढत आहे.

नवीन वर्षाची सुरवात चांगली व्हावी म्हणून अनेकांनी गोदाघाटावरील मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लावली. काळाराम मंदिर परिसर असो वा हरिहर मंदिर, महालक्ष्मी मंदिर असो वा राम मंदिर, यशवंत महाराज मंदिर, गांधी ज्योत, मारूती मंदिर आदी ठिकाणी ममोठया प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. देवदर्शनानंतर बाजारातही हे पर्यटक वळल्याने बाजारातही गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही गर्दी कायम होती. दुपारी उन्हाचा तडाखा जास्त बसत असल्याने 1 ते 4 या कालावधीत गर्दी ओसरली होती. परंतु सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत गर्दी कायम होती. नववर्षानिमित्त शहर परिसरात निघालेल्या शोभायात्रा पाहण्याबरोबरच संध्याकळी ढोल ताशांचे पथक बघण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली.

पर्यटकांनी देवदर्शन करण्याबारोबच पंचवटी, अमृतधाम परिसरात असलेल्या छोटया मोठया परिसरांनाही भेटी दिल्या. याशिवाय तपोवनातही काही प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

*