दरोडेखोरांची टोळी जेरबंद

0

पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, मुकुंदनगरचा सईजात पसार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील चास शिवारात पोलीस चार दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून चाकू, पहार, कटावणी, कोयते व एक कार असा 5 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

असीम अतिक कुरेशी (रा. चांदा, ता. नेवासा), दिपक रविकांत उपाध्ये (रा. केडगाव), शुभम रमेश खरात (मौर्या पार्क, एमआयडीसी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा साथीदार सईजात (रा. मुकूंदनगर) हा पसार झाला आहे.
मंगळवारी (दि.20) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास किशोर परदेशी व पोलीस उपअधिक्षक आदंन भोईटे हे रात्रगस्त घालत होते. पोलीस पथक चास शिवारात असताना आरोपी हे एका ट्रकला लुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांना दिसले. किशोर परदेशी यांच्या पथकाने आरोपींचा पाटलाग करुन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. पोलिसांनी चौघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, कोयते, कटावणी यांच्यासह दरोडे टाकण्याचे साहित्य व नंबर नसलेली जीप मिळून आली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या ताब्यातून एकूण 5 लाख 65 हजार रुपांयचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे सर्व आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

*