Type to search

क्रीडा

दबावाच्यावेळी अनुभवी खेळाडूंची भूमिका महत्वाची !

Share
लंडन। सध्याचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स केरीचे मत आहे की आगामी विश्वचषकात दबावाच्यावेळी संघाचे सीनियर खेळांडूचा अनुभव खुप महत्वपूर्ण होईल.आयसीसी वेबसाइटच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाई संघ 30 मे पासून इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्समध्ये सुरू होणारे विश्वचषकासाठी शुक्रवारी इंग्लंड पोहचला.

दिग्गज रिकी पॉटिंग आगामी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाई संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असेल. पॉटिंग आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला 1999, 2003 आणि 2007 मध्ये विश्वचषक विजेतेपद मिळऊन दिले. या व्यतिरिक्त संघाचे फील्डिंग प्रशिक्षक ब—ेड हेडिन 2015 मध्ये विश्वचषक विजेता संघाचा सदस्य राहिला आहे.

केरीने संघाचे येथे आगमन होताच पत्रकारांना सांगितले आमच्याकडे खुप अनुभव आहे. ब—ॅड हेडिन मागील विश्वचषकात खेळले आहे. रिकी पॉटिंग आमच्यासोबत जुडत आहे. आमच्याकडे अनेक असे खेळाडू आहे, जे मागील विश्वचषकात खेळले आहे.या सर्वांच्या व्यतिरिक्त सध्याच्या काळात संघात अनेक असे सीनियर खेळाडू आहे, जे मागील विश्वचषकात संघाचा घटक राहिला आहे, जेथे संघाने विजेतेपद जिंकले होते.

या सीनियर खेळांडूमध्ये एरॉन फिंच, डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्क, स्टीव स्मिथ, पेट कमिंस आणि ग्लेन मेक्सवेल सारखा खेळाडू मागील विश्वचषकात संघाचा घटक राहिला आहे आणि हे खेळाडू यावेळी संघात समाविष्ट आहे.त्याने सांगितले संघासोबत अनेक असे खेळाडू आहे, ज्याकडे खुप अनुभव आहे आणि मला वाटते की त्याचा हा अनुभव त्यावेळी खुप कामी येईल, जेव्हा संघ खुप दबावात असेल.27 वर्षीय केरीने सांगितले स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाई संघ आपले गेम प्लानवर लक्ष केंद्रित करेल ना की विरोधी संघाच्या योजनेवर. ऑस्ट्रेलियाने सध्याच्या काळात घराबाहेर सतत आठ एकदिवसीय सामना जिंकला आहे.

यष्टीरक्षकाने सांगितले आमच्याकडे एक निश्चित गेम प्लान आहे, जे की मागील आठ सामन्यात मजबुत संघाविरूद्ध खुप यशस्वी राहिला. आमच्यासाठी हे आवश्यक आहे की आ म्ही आपल्या शक्तीनुसार खेळावे. विश्वचषकात प्रत्येक संघाकडे आपली एक शक्ती आहे, परंतु आम्ही विरोधी संघाच्या गेम प्लानवर जास्त विचार करत नाही.विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला आपला पहिला सामना एक जूनला अफगानिस्तानसोबत खेळायचे आहे.आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की आम्ही मागील काही महिन्यात खुप यशस्वी राहिलो असे त्याने सांगितले. वॉर्नर आणि स्मिथ परत आला आहे. ते खुप अनुभवी खेळाडू आहे. फिंच वास्तवात चांगले लयात आहे. आमचे वेगवान गोलंदाजही खुप चांगले करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!