Type to search

जळगाव

थोरगव्हाण येथील भाजपच्या  उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

Share
मनवेल ता यावल( वार्ताहर ) येथुन जवळच  थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या उपसरपंच सौ. ज्योती केवल पाटील यांच्या विरूध्द ८ ग्राम पंचायत सदस्यांनी तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
या संदर्भातील वृत असे की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. ज्योती केवल पाटील या ग्राम पंचायतीच्या कारभारात मनमानी अविचारी शब्दांचा वापर करतात, तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळी काही एक कारण नसतांना किरकोळ कामकाज सोडुन काही लोकांना शिवीगाळ करतात त्यांच्या अशा वागणुकीच्या त्रासाला कंटाळुन ग्राम पंचायत सदस्य हिरालाल श्यामराव चौधरी, पदमाबाई विनोद पाटील, मनोहर कृष्णा पाटील, मथुराबाई जगदीश पाटील, शिन्दुबाई राजेन्द्र पाटील, गोपाळ शालीक पाटील, अशोक गोबा भालेराव . यशोदाबाई आनिल भालेराव यांच्या यादाखल केलेल्या अविश्र्वास प्रस्तावावर स्वाक्षरी आहेत एकुण ९ सदस्य असलेल्या या ग्राम पंचायत मध्ये सरपंच गटाचे ४ सदस्य आणी विरोधी गटाचे पाच सदस्य असुन , विरोधी आणी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी एकत्र येवुन लोकनियुक्त सरपंच उमेश देवराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात पाच उपसरपंच होतील असे ठरले असतांना विद्यमान उपसरपंच सौ. ज्योती केवल पाटील यांच्या उपसरपंचपदाचे कार्यकाळ हे फेब्रुवारी मध्ये पुर्ण झाल्याने त्यांनी ठरल्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे क्रमप्राप्त होते पण पाच महीने अधिक वेळ झाल्याने अखेर ९ पैक्की८ सदस्यांनी तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे,यावेळी दिपक बाविस्कर उपास्थित होते.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!