थायबॉक्सिंग स्पर्धेत वैभव नागपुरेला कांस्यपदक

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत वैभव विनोद नागपुरेला कांस्यपदक मिळाले आहे. 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धा वाडीया पार्क येथे झाल्या. त्यात वैभव विनोद नागपुरे याला सुवर्णपदक मिळाले. व त्याची निवड सातारा येथे होणार्‍या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले. तो आयडीयल भुतकरवाडी शाखेतून थायबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. त्याला वैभव आव्हाड, घनश्याम सानप, आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. तो समर्थ विद्यामंदिर शाळेचा 9 वीचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

*