‘थप्पड’ प्रकरण : गोविंदाला मागावी लागली बिनशर्त माफी!

0

१६ जानेवारी २००८ रोजी गोविंदाने संतोष राय नावाच्या एका तरुणाला चित्रपटाच्या सेटवर कानाखाली मारली होती. त्यावेळी गोविंदा माध्यमांना मुलाखत देत होता. त्यानंतर या तरुणाने थेट सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तरुणाच्या तक्रारीनंतर न्यायालयाने गोविंदाला कायदेशीर नोटीस बजावली होती.

दरम्यान, आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, गोविंदाने कुठल्याही प्रकारची अट न ठेवता त्या तरुणाची सशर्त माफी मागावी. या निर्णयानंतर लगेचच गोविंदाने न्यायालयात माफीनामा सादर केला असून, न्यायालयाने त्यास मंजुरी दिली आहे.

गोविंदाच्या माफीनामा प्राप्त होताच हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्याचे समजते.

मात्र गोविंदा संतोषची केवळ माफीच मागणार नसून, त्याला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाईही देणार आहे.

यावेळी न्यायालयाने गोविंदाचा तो व्हिडीओदेखील बघितला ज्यामध्ये गोविंदा अतिशय रागाने त्या तरुणाला मारत होता. कोर्टाच्या आदेशानंतर गोविंदाने गेल्यावर्षी त्या तरुणाची कुठलीही अट न ठेवता माफी मागितली होती. मात्र यावेळी त्याने स्वत: माफी मागितली नव्हती तर वकिलांच्या माध्यमातून मागितली होती.

LEAVE A REPLY

*