‘त्या’ व्हिडिओवर काजोलचे स्पष्टीकरण

0
अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत ती आपल्या मैत्रिणींसोबत एका लंच पार्टीला गेली होती.

तेव्हा तिथे तिने बीफ खाल्ल्याचे समोर आलेय. भारतात गोमांस (बीफ) बंदी असल्यामुळे नेटिझन्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. प्रकरण वाढण्याआधीच काजोलने ट्विट करून तिची बाजू मांडली आहे.

काजोलने ट्विट केलंय की, ‘माझ्या मैत्रिणींसोबत मी बीफ खात असल्याचे एका व्हिडिओत म्हटले गेले आहे.

त्यात बोलण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. ते बीफ नव्हतंच. व्हिडिओत जी डीश दाखविण्यात आलेली ते म्हशीचं मटण होतं आणि हे खाण्यास कायदेशीर परवानगी आहे. हा एक संवेदनशील मुद्दा असल्यामुळेच मी हे स्पष्टीकरण देतेय. यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.’

LEAVE A REPLY

*