‘ते’ दोघांचा दारूच्या नशेतच स्टंटबाजी करताना दरीत पडून मृत्यू!

0

 

आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावे आहेत.

सुरूवातीला सेल्फी काढण्याच्या नादात हे तरूण दरीत कोसळल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे तरूण सेल्फी काढताना नव्हे तर दारूच्या नशेत साहस करायला गेल्यामुळे दरीत कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दारु प्यायल्यानंतर दोघे जण डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. या दोघांना स्वत:च्या पायांवर धड उभेही राहता येत नव्हते. त्यात म्हणजे या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर चढून दोघेही जण डोंगराच्या टोकावर उभे राहिले.

तेव्हा दोघांपैकी एकाचा तोल गेला आणि जाता जाता त्याने दुसऱ्यालाही आपल्यासोबत खाली खेचले, असे व्हिडिओत दिसत आहे. दरीत दोघांच्या मृतदेहाचा शोध लागला असून सोमवारपासून हे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मात्र दाट धुके व पावसामुळे या कार्यात अडथळे येत आहेत.

 

LEAVE A REPLY

*