तेलीखुंट, कपिलेश्‍वर, मंगलगेट, महावीर प्रतिष्ठान बक्षीसाचे मानकरी; गणेशोत्सव देखावे स्पर्धा

0

उत्साहात वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेचा निकाल महापालिकेने जाहीर केला असून तेलीखुंट मित्रमंडळाच्या ‘रयत राजा’, कपिलेश्‍वर मित्र मंडळाच्या ‘सीता स्वंयवर’ महावीर प्रतिष्ठानच्या ‘होम स्वीट होम’ आणि मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या ‘स्त्री जन्माचे स्वागत’ या देखाव्यांना प्रत्येकी 11 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले आहे. सेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते मंडळांना ही बक्षीसे आज प्रदान करण्यात आली.
उत्कृष्ट देखावे असणार्‍या मंडळांना महापालिकेच्यावतीने बक्षीस दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र समिती देखाव्यांची पाहणी करत असते. 2016-17 वर्षातील निकाल महापालिकेने नुकताच जाहीर केला आहे. समाज प्रबोधन विषयात तेलीखुंट मित्रमंडळाच्या ‘रयत राजा’ देखाव्याला 11 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले. सिध्देश्‍वर तरुण मंडळाच्या ‘पैसा झाला परमेश्‍वर’ देखाव्याला दुसरे 7 हजार रुपयांचे तर पटवर्धन प्रतिष्ठानच्या ‘स्वराज्य ते सुराज्य’ देखाव्याला 5 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले आहे.
ऐतिहासीक, धार्मिक व अध्यात्मिक विषयातील पहिले 11 हजार रुपयांचे बक्षीस कपिलेश्‍वर मित्र मंडळाच्या ‘सीता स्वयंवर’ दुसरे 7 हजार रुपयांचे बक्षीस नंदनवन मित्रमंडळाच्या ‘श्रीकृष्ण रासलिल’ तर तिसरे पाच हजार रुपयांचे बक्षीस खिस्तगल्लीतील वर्धमान तरुण मंडळाच्या ‘वैष्णव देवीची गुहा’या देखाव्यांना मिळाले आहे. स्त्री भ्रुण हत्या, हुंडाबळी व पर्यावरण संतुलन (राजमाता जिजाऊ विशेष पुरस्कार) विषयाचे पहिले बक्षीस मंगलगेट प्रतिष्ठानच्या ‘स्त्री जन्माचे स्वागत’ या देखाव्याला मिळाले आहे. 11 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरुप आहे. छत्रपती शिवाजी आखाडा तरुण मंडळाच्या ‘स्त्री शक्तीचा जागर’ या देखाव्याला 7 हजार रुपयांचे दुसरे तर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्या ‘वृक्ष संवर्धन’ या देखाव्याला 5 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले आहे. सोशल मिडिया, आधुनिक तंत्रज्ञान, दुष्काळ, पाणी बचत व वाहतूक नियमांवर आधारीत विषयातील पहिले 11 हजार रुपयांचे बक्षीस माणिक चौकातील महावीर प्रतिष्ठानच्या ‘होम स्वीट होम’ या देखाव्यास मिळाले आहे. नांगरे गल्लीतील जयहिंद तरुण मंडळाच्या ‘सेल्फीच सैराट वेड’ या देखाव्याला 7 हजार रुपयांचे दुसरे तर जय भवानी तरुण मंडळाच्या (आंबेडकर चौक) ‘सैराट’ साक्षरता अभियान देखाव्याला 5 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले आहे.
उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून श्री समर्थ आर्टस (उपनगराचा राजा मित्र मंडळ, यशोदानगर) 3 हजार रुपयांचे पहिले तर कपिलेश्‍वर मित्रमंडळाचे मूर्तीकार प्रफुल्ल लाटणे यांना 2 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले आहे. महावीर प्रतिष्ठानचे नितीन जावळे यांना उत्कृष्ट निवेदक म्हणून 3 हजार रुपयांचे पहिले तर प्रसाद बेडेकर यांना दोन हजार रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले आहे. शनैश्‍वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळास 3 हजार रुपयांचे पहिले बक्षीस उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी जाहीर झाले आहे. शिववरद प्रतिष्ठानच्या बबलू ढोरे यांना 2 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
उत्कृष्ट संगीताचे पहिले 3 हजार रुपयांचे बक्षीस नवग्रह मित्र मंडळाच्या चेरिश ऑडिओ रेकॉर्डिगला मिळाले आहे. दुसरे दोन हजार रुपयांचे बक्षीस जय आनंद महावीर युवक मंडळाचे रामेश्‍वर ढोरे यांच्या शांती ऑडिओला मिळाले आहे. उत्कृष्ट नेपथ्यसाठीचे पहिले 3 हजार रुपयांचे बक्षीस नारायण बुरा यांना तर दुसरे दोन हजार रुपयांचे बक्षीस गणेश छिंदम यांना मिळाले आहे.

विशाल गणपती मंडळाची शिस्तबध्द मिरवणूक प्रथमविशाल गणपती मंडळाची शिस्तबध्द मिरवणूक प्रथम  मराठमोळ्या संस्कृतिचे जतन करणारी तसेच समाजप्रबोधन व शिस्तबध्द, पारंपरीक पध्दतीची विसर्जन मिरवणुकीचे पहिले 5 हजार रुपयांचे बक्षीस शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंडळास मिळाले आहे. माळीवाड्यातील कपिलेश्‍वर मित्र मंडळास 3 हजार रुपयांचे दुसरे तर घुमरे गल्लीतील आनंद प्रतिष्ठानला 2 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले आहे.

LEAVE A REPLY

*