तेजसमध्ये आता साधे हेडफोन्स!

0

गेल्या आठवड्यात तेजस एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरु झाल्यानंतर, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात सिनेमा पाहण्यासाठी, किंवा गाणी ऐकण्यासाठी हेडफोन दिले होते. पण वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स काही प्रवाशांनी परत केलेच नाही.

विशेष म्हणजे, यावेळी दोन एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली होती.

बुधवारच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी हेडफोन्स न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकारामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

त्यामुळे आता यावर रेल्वेनं साधे हेडफोन देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने तेजसमध्ये पुरवलेले हेडफोन्स 200 रुपये किमतीचे असून, यातील जळपास 300 हून अधिक हेडफोन चोरीला गेल्याची माहिती आहे.

त्यामुळे रेल्वेचे आणखी नुकसान टाळण्यासाठी आणि पुढील प्रवाशांना चांगली सुविधा पुरवण्यासाठी साधे हेडफोन्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी आयआरसीटीसीने 30 रुपये दराने 1 हजार नवे हेडफोन खरेदी केल्याचं समजतं आहे.

LEAVE A REPLY

*