तुरुंगातील व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी शशिकला यांनी दिले २ कोटी; तुरुंगातील पोलीस महानिरीक्षकाचा अहवाल सादर

0

बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहाच्या पोलीस महानिरीक्षक डी. रुपा यांच्या अहवालानुसार, अण्णाद्रमुक पक्षाच्या मुख्य सचिव शशिकला यांच्या जेवणासाठी तुरुंगात विशेष स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

यासाठी शशिकला यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटींची दिल्याची माहितीदेखील अहवालात आहे.

पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) डी. रुपा यांनी पोलिसांना दिलेल्या अहवालात व्हीआयपी सुविधांसाठी शशिकला यांनी लाच दिल्याची गंभीर माहिती देण्यात आली आहे. ‘पोलीस महासंचालकांना याबद्दलची माहिती असूनही शशिकला यांना व्हीव्हीआयपी सुविधा देण्यात येत आहेत. यासाठी दोन कोटींचा व्यवहार झाला आहे. स्वत: पोलीस महासंचालकदेखील यामध्ये सामील आहेत,’ असे पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) डी. रुपा यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

शशिकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा झाली आहे.

पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) डी. रुपा यांनी त्यांच्या वरिष्ठांशिवाय आणखी कोणाला हा अहवाल पाठवला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डी. रुपा यांनी काही आठवड्यांपूर्वीच पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) पदाची जबाबदारी घेतली. १० जुलै रोजी रुपा यांनी तुरुंगातील स्थितीचा आढावा घेतला होता.

 

LEAVE A REPLY

*