तीन महिला आमदारांना अश्‍लील मेसेज पाठविल्याप्रकरणी गुप्ताला चार दिवस कोठडी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  तिन महिला आमदारांना अश्‍लिल मेसेज पाठविल्याप्रकरणी मुंबई येथील विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिसांनी जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मुंबई पोलिसांनी गुप्ता याला अटक केली. दरम्यान त्याला आज मुंबई न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तिन महिला आमदारांना दि.२१ फेब्रुवारी रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास मोबाईलवर अश्‍लील मेसेज आला होता. याप्रकरणी मुंबईच्या विलेपार्ले पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनुसार तपास केला असता, जळगावातील शिवाजीनगरात राहणार्‍या दीपक गुप्ता याच्या मोबाईल नंबरवरुन अश्‍लील मेसेज आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी काल जळगावात येवून गुप्ता याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुंबई न्यायालयात हजर केले असता, दीपक गुप्ता याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*