तीन दशकांनंतर भारतीय लष्करात नव्या तोफांचा समावेश, आज पोखरणमध्ये चाचणी

0

तीन दशकांनंतर भारतीय लष्कराला नव्या तोफा (आर्टिलरी गन्स) मिळणार आहेत.

आज (गुरुवारी) राजस्थानमधील पोखरणमध्ये अमेरिकेहून आणलेल्या दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफांची चाचणी घेण्यात येणार आहे.

अमेरिकेकडून एम ३७७ तोफांच्या खरेदीसाठी २०१० पासून बातचीत सुरु होती. अखेर मागील वर्षी २६ जून रोजी याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.

आता भारत अमेरिकेकडून १४५ तोफा खरेदी करणार आहे. यासाठी २,९०० कोटींचा करार करण्यात आला आहे.

फॉरेन मिलिटरी सेल्सच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये हा करार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*